Pik Nuksan Bharpai Online Form- Crop Insurance Claim:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती. सध्या वातावरण खराब असल्यामुळे शेती मधल्या पिकांमध्ये खूप जास्त नुकसान होत आहे. या नुकसानाचे भरपाईसाठी सरकारने शेतकरी मित्रांसाठी पिक विमा योजना म्हणजे पिक विमा नुकसान भरपाई ऑनलाईन फॉर्म इन्शुरन्स ची सुविधा काढलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाई फॉर्म भरू शकता म्हणजे पिकांचा विमा काढू शकता जेणेकरून जे काही नुकसान झालेला आहे त्याचे पैसे तुमच्यापर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होतील.
आता इथे नेमके शेतकरी मित्रांना प्रश्न पडला असेल की पिकांचे नुकसान झाल्यास काय करायचे किंवा त्याबद्दल भरपाई साठी कोणत्या कोणत्या योजना आहेत किंवा त्याची जी भरपाई आहे ती कोणत्या पद्धतीने भेटून जाणार आहे.Pik Nuksan Bharpai Online Form- Crop Insurance Claim
Pik Nuksan Bharpai Online Form- Crop Insurance Claim
शेतकरी मित्रांसाठी ही संपूर्ण माहिती आपण इथे मांडण्यात आले आहे, म्हणजेच शेतकरी मित्रांचे जर पिकाचे नुकसान झाले असेल तर काय करता येईल, पीक नुकसानीचे प्रकार कोणते आहे, ज्यामुळे तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स क्लेम करता येईल म्हणजेच पिक विमा नुकसान भरपाई तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येयील.
पीक नुकसानीचे प्रकार म्हणजे त्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान आहे, त्यानंतर अवकाळी पावसामुळे होणारे पिकाचे नुकसान, जर तुम्ही पीक वेळे वरती काढले नाही म्हणजेच पीक काढणीपश्चात होणारे नुकसान, आता हे नुकसान झाल्यानंतर पीक नुकसानाची संपूर्ण माहिती कशी कळवायची त्याची प्रोसेस काय आहे म्हणजेच पीक नुकसानी ची माहिती कळविण्याची कार्यपद्धती काय आहे, पीक नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीशी संपर्क कसा करायचा आहे, पीक नुकसानीचा पंचनामाचं कार्य कसं करता येईल, पीक नुकसानीची माहिती कळविण्याची कार्यपद्धती, पीक नुकसान झाल्यावर विमा कंपनीशी संपर्क कसा करावा, पिक विमा हे एप्लीकेशन द्वारा त्याची संपूर्ण माहिती कशी कळवावी ,त्याच्यानंतर पीक नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी जे लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत ते कोणते आहेत, पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती, या सर्व्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या देण्यात आली आहे.Pik Nuksan Bharpai Online Form- Crop Insurance Claim
Pik Nuksan Bharpai Yojana 2024| पिक नुकसान भरपाई योजना 2024 काय आहे
पिक विमा योजना म्हणजेच क्रोप इन्शुरन्स स्कीम(Crop Insurance Scheme) हे आपल्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास काढण्यात आली आहे. जेणेकरून जे काही पिकांचे नुकसान होईल त्याच्यामुळे शेतकरी बंधू खचून न जाता त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होईल व जे काही आपत्ती त्यांच्यासमोर उभी आहेत त्यांना ते सामोरे जाऊ शकतील.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे जे काही पिकांचे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई घेऊन त्यांना आर्थिक दृष्टीने प्रोत्साहित करण्याचा उद्देश महाराष्ट्र सरकारचा आहे . पीक विमा योजना केंद्र सरकार द्वारे चालू केली आहे .त्यामुळे शेतकरी बंधूंचे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे व नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्ती पासून शेतकऱ्यांना मदत मिळून जाणार आहे.Pik Nuksan Bharpai Online Form- Crop Insurance Claim
Types of Crop Insurance: पिक नुकसानीचे प्रकार
पिक विमा करण्यापूर्वी शेतकरी बंधूंना हे माहिती असायला हवे की पीक नुकसानीचे प्रकार कोणते कोणते आहेत. शेतकरी मित्रांचे बऱ्याच विविध कारणामुळे शेतीतील पिकाचे नुकसान होत असते. पण या पिकाच्या नुकसानीसाठी कोणते पिक विमा पात्र असणार आहे आणि पीक विमा म्हणजेच क्रोप इन्शुरन्स कोणत्या पीक नुकसानीमुळे मिळू शकतं .हे सर्व माहिती ते डिटेल्स मध्ये दिले आहेत . पीक नुकसानीचे भरपाईसाठी काही प्रकार आहेत ते खाली सविस्तरपणे मांडण्यात आले आहे.
- पहिलं म्हणजे पिकाचे नुकसान अवकाळी पावसामुळे होणे.
- दुसरे पीक काढायला उशीर होणे किंवा काढणी पश्चात होणारे नुकसान.
- तिसरे वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान.
पिकाचे नुकसान अवकाळी पावसामुळे होणे व पिक नुकसान भरपाई प्रक्रिया
पिकनुकसान जर अवकाळी पावसामुळे झाला असेल म्हणजेच कापूस मका सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान यामुळे होते. आता हे नुकसान झाल्यानंतर शेतकरी मित्रांनी जर पीक विमा काढला असेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला पिक विमा कंपनीला हे सूचना द्यायची आहे व पिकाच्या नुकसानाचे भरपाईसाठी दावा करायचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पिक विमा काढला आहे तर क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनच्या मदतीने विमा कंपनीला 72 तासाच्या पिकाच्या नुकसानी बद्दल तक्रार करायची आहे. तुम्ही 72 तासाच्या आत हे पिक नुकसानी बद्दल तक्रार करू शकता. तक्रारीनंतर तुम्हाला डॉकेट आयडी . अर्जदाराला म्हणजेच शेतकरी बंधूंना तुमच्या अर्जाची जी स्थिती आहे ऑनलाइन पद्धतीने भेटेल. पिक विमा कंपनीकडून प्रतिनिधी येईल ते लोक पिकाचे नुकसान किती झाले आहे हे बघण्याकरता शेतात येऊन पिकाच्या नुकसानीचे संपूर्ण अहवाल तयार करतात व त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होतात पिक विमा कंपनीतर्फे.
पीक काढायला उशीर होणे किंवा पिक काढणीपश्चात होणारे नुकसान
पिक काढणीपश्चात होणारे नुकसान म्हणजे शेतकरी बंधूंनी ज्या पिकांच्या काढणीनंतर पिकांना सुकवण्यासाठी शेतात पीक राहू दिले व त्या दिवसां मध्येच म्हणजेच काही दोन आठवड्याच्या आतच एकूण 14 दिवसाच्या आत गारपीट चक्रीवादळ किंवा बिगर मोसमी पाऊस यासारख्या संकट आले तर पिकांचे नुकसानाची शक्यता आहे . त्यामुळे पिक विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळू शकते.

✅E-Pik Pahani 2024 Application:ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!
वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान व त्याची पीक भरपाई प्रक्रिया
वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान म्हणजे रानडुक्कर, माकड, सारंग, हरीण असे अनेक वन्य प्राण्यांपासून शेतीमधल्या पिकांचे नुकसान केले जाते ,या प्रकारचे नुकसानीसाठी भारत सरकारने त्यांच्या मार्फत आर्थिक मदत दिली आहे, पण ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकरी बंधूंना वेळेत अर्ज करणे हे आवश्यक आहे, ही अर्ज करताना त्या अर्जासोबत ज्या शेताचे नुकसान झालेले आहे ज्या शेतातल्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेताचे पंचनामा मोजणी व नुकसानीबाबत सर्व पुराव्यांचे कागदपत्रे घेऊन जवळच्या क्षेत्रातील उपवन रक्षक, उपविभागीय अधिकारी ,वनक्षेत्रपाल कार्यालयात द्यावेत लागणार आहे, त्यानंतर इथे शासन निर्णयानुसार तुम्हाला वन्य प्राण्यांपासून झालेल्या पीक नुकसानाची संपूर्ण भरपाई देण्यात येते.
1. वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यानंतर या पिकांचे नुकसान पाहण्यासाठी जवळचे वनरक्षक वनपाल किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्याकडून तीन दिवसाच्या आत संपूर्ण करायची आहे .
2 .शेतातल्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर गावातल्या सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांच्या मार्फत कमीत कमी 10 दिवसांच्या आत पीक नुकसानाची तक्रार करावी.

पिक नुकसान भरपाई ऑनलाइन फॉर्म-Crop Insurance Claim
शेतकरी बंधूंच्या पिकांचे नुकसान झालं असेल आणि तुम्ही पिक विमा भरला असेल .नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्हाला क्लेम करावा लागतो. जी काही पीक विम्याची रक्कम आहे ते क्लेम केल्यानंतरच ती मिळते . तर तुमचं कोणत्याही पावसाने नुकसान झाला असेल किंवा अन्य कोणत्याही कारणाने जर तुमचं नुकसान झाले त्यासाठी क्लेम करणं गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे घेऊन जाणार आहे आता हे जे प्रोसेस आहे कशी करायची आहे आपण सविस्तरपणे या लेखांमध्ये मांडण्यात आली आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून प्लेस्टोर ओपन करायचे आणि प्ले स्टोअर वरती सर्च करायचे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स असे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन दिसेल क्रॉप इन्शुरन्स दहा लाख प्लस डाऊनलोड आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा आहे .
- आणि जर तुम्ही अगोदर इन्स्टॉल केलं असेल तर त्याला अपडेट करून घ्या किंवा पुन्हा इंस्टॉल करा .
- इन्स्टॉल करून आपल्याला App ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इंटरव्हिज दिसेल तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसतील.
- Register as Farmer, Login for Policies, Continue as Guest, Change Language.
- आता इथे तीन नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे Continue as Guest त्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे पाच ऑप्शन दिसतील
- आपल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस. वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे दोन ऑप्शन येतील क्रॉप लॉस Intimation आणि क्रॉप लॉस स्टेटस इंटिवेशन.
- त्यातला पहिला ऑप्शन निवडायचा आहे क्रॉप लॉस इंतीमेशन.
- त्यानंतर तुमचा मोबाईल जो रजिस्टर आहे तो टाकायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी येऊन जाणार आहे सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ती ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला पुढे नवीन इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे तुम्हाला की स्कीम कोणती घ्यायची आहे.
- त्याच्या ऑप्शनमध्ये सीजन, वर्ष, स्कीम आणि स्टेट येऊन जाईल तुम्हाला सीझनमध्ये दोन ऑप्शन येतील खरीप आणि रबी. जो सीजन आहे त्यानुसार तुम्हाला करायचा आहे तुम्हाला त्यानंतर इयर आता 2024 चालू आहे त्यामुळे पण 2024 सिलेक्ट करूया त्यानंतर स्कीम कोणती आहे आपली रेगुलर प्रधानमंत्री फसल बीमा योजना फळबागेचा तर तुम्ही दुसरा अशा पद्धतीने सेलेच्त करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला असेच वन बाय वन स्टेप पुढे जायचं आहे तुम्हाला इथे विचारलं जाईल तुमचा जो फॉर्म आहे ते कोणी भरला आहे तिथे विचारला जाईल फार्मर ऑनलाईन असं सिलेक्ट करा.
- नंबर तिथे टाकायचा आहे पॉलिसी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे येऊन जाईल आणि तिची पॉलिसी दिसणार आहे त्या ब्लॉक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- ज्या पिकांचा नुकसान तिथे झालेला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे समजा तुम्हाला इथे बाजरीचे नुकसान झालं असेल तर तुम्ही बाजरी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचे नुकसान कधी झाले त्याची तारीख सर्व माहिती ते भरायचे आहे.
- अशा पद्धतीने एक एक करून सर्व स्टेप्स तुम्ही भरत गेल्यानंतर तुम्ही पीक नुकसान भरपाई म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स क्लेम करू शकता हे क्लेम केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या अकाउंटला शेतकरी मित्रांना शेतकरी बंधूंना पैसे येऊन जाणार आहेत किंवा म्हणजेच तुमची भरपाई तुम्हाला भेटून जाणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃Pik Nuksan Bharpai Online Form | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit maharojgaryatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!