E-Peek Pahani Last Date: नमस्कार शेतकरी मित्रांनो,ई -पीक पाहण्या करण्यासाठी आज अंतिम मुदत असणार आहे जी एपिक पाहणी खरीप हंगामा 2024 साठी आज म्हणजेच 15 सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख आहे त्यांनी ई -पीक पाहणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आजची संधी आहे करून घ्यायची आहे . जर तुम्ही ई -पीक पाहणी केली नसेल तर पिक विमा, पीक कर्ज वाटप, नुकसान भरपाई देखील दिली जाणार नाही , म्हणून ज्या शेतकरी मित्रांची ई -पीक पाहणी करायची राहिली आहे केली नाही त्यांनी लवकरात लवकरई -पीक पाहणी करून घ्यायची आहे. ई -पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकणार आहात त्याची सविस्तर माहिती मांडण्यात आलेली आहे. ऑनलाईन ॲप आहे त्याद्वारे तुम्ही ई -पीक पाहणीची अर्ज करू शकणार आहात.
राज्यात शेतकऱ्यांकरता ई -पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. नोंदणीसाठी गुरुवारपासून म्हणजेच 01 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. ०१ ऑगस्ट 2024 पासून ई -पीक पाहणी 3.0 DCS या अँप द्वारा तुम्ही ऑनलाइन एप्लीकेशन करू शकणार आहात. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकऱ्यांना ही पीक पाणीची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या आधीच पीक पाहणी करून घ्यावी ,त्याची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन राज्य कृषी विभागांना केले आहे.
ई -पीक पाहणी हे उपक्रम शेतकऱ्यांसाठी मागच्या तीन वर्षांपासून सरकार राबवत आहे . शेतकरी मित्रांमध्ये सध्या ई -पीक पाहण्याविषयी बरीच चर्चा सुरू आहे. या उपक्रमाद्वारे शेतकरी मित्र आपल्या शेतीच्या सात बारा उताऱ्यावर आपल्या शेतातील पिकांची नोंद करू शकतात.E-Peek Pahani 2024
ई-पीक पाहणी काय आहे??
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी माझा सातबारा प्रकल्प राबवली आहे. ज्यामध्ये सातबारा वरती पीकांची नोंद आपल्या हाती करता येणार आहे .शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत ऑनलाइन पद्धतीने ई -पीक पाहणी वर्जन ०३ एप्लीकेशन द्वारे नोंद घ्यावी यासाठी सरकार अंमलबजावणी करण्यात करत आहे .E-Peek Pahani Last Date
“माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझे पीक पेरा” असे घोषणा देत प्रोत्साहित करण्यात आले आहे. पाहणी केली नाही तर शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई हमीभाव खरेदी पीक कर्ज या लाभांपासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांनी यापासून वंचित न राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी ई -पीक पाहणी वर्जन थ्री डीसीएस द्वारे ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा वरती नोंदणी करण्यासाठी एप्लीकेशन घेऊन आलेले आहे. आता यामध्ये नोंदणी कशी करायची हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. खूप सोपे स्टेटस आहेत एक एक स्टेप्स फॉलो केले तर कोणतीही चूक होणार नाही व तुम्ही सहज पद्धतीने चालू पिकांची नोंदणी करू शकता.
ई-पीक पाहणी नोंदणी | E-Peek Pahani Last Date
प्रकल्प नाव | ई-पीक पाहणी प्रकल्प |
प्रकल्प विभाग | महाराष्ट्र कृषी व महसूल विभाग |
मिळणारा लाभ | पिक विमा रक्कम |
ई-पीक पाहणी २०२४ सुरुवात तारीख | ०१ ऑगस्ट 2024 |
ई-पीक पाहणी २०२४ मुदत | 15 सप्टेंबर 2024 |
ई-पीक पाहणी नोंदणी मोबाईलवरून कशी करायची ?E-Pik Online Form 2024
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव खूप संकटांना सामोरे जावे लागते. पावसातील खंड व दुष्काळी परिस्थितीमुळे पिक विमा ला महत्त्व आले आहे. यावर्षीही ऑगस्टपासून बहुत या भागांमध्ये मोठा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून पिके जाण्याची शक्यता जास्त आहे . कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांचे उत्पादन 50% पेक्षा कमी येण्याची शक्यता आहे असे शेतकरी सांगतात.
अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी ई-पीक पाहणी हे खूप मोठे शेतकऱ्यांना वरदान व आधार मिळाला आहे, जेणेकरून पिक विमा पाहणीवर शेतकरी अवलंबून राहू शकतो . ई-पीक पाहणीत आपण ज्या पिकांची नोंदणी करणार आहात तेच पीक गृहीत धरण्यात येणार आहे . 01 ऑगस्ट 2024 पासून ई-पीक विमाचे ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन द्वारा नोंद करण्यास सुरुवात झालेली आहे .यासाठी काही स्टेप्स आहेत ते आपण सोप्या पद्धतीने खाली मांडण्यात आलेली आहे .ते ते एकेक करून तुम्ही अनुसरून करायचं आहे व ई-पीक नोंदणी करून घ्यायची आहे.E-Peek Pahani Last Date

ई-पीक पाहणी 2024 ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर प्रक्रिया –
- सुरुवातीला ई-पीक पाहणीचं मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचे.
- त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर ला जाऊन इंग्लिश मध्ये पिक पाहणी सर्च करायचंय हे सर्च केल्यानंतर इन्स्टॉल करा.
- ॲप डाऊनलोड केलं की आपलं मनःपूर्वक स्वागत अशी एक माहिती स्क्रीनवर दिसेल, त्याला उजव्या बाजूला स्क्रोल करा ,त्यानंतर ॲप वापरण्यासाठी आवश्यकता दिसेल त्यालाही उजव्या बाजूला स्क्रोल करा.
- आता नोंदणीसाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल असा मजकूर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यात खाली तुमचा महसूल विभाग निवडा तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील.
- ऑप्शन काय काय असतील- अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे ऑप्शन असतील तुम्ही ज्या महसूल विभागातून येतात त्या महसूल विभागाला निवडायच आहे.
- महसूल निवडल्यानंतर तुम्हाला लोगिन पद्धती निवडावे लागेल त्यात पण दोन पर्याय आहेत-शेतकरी म्हणून व इतर .
- तुम्हाला इथे शेतकरी म्हणून पर्याय निवडायच आहे. शेतकरी म्हणून लॉगिन करा यावर क्लिक करा व तुमचा मोबाईल नंबर टाका.
- नंतर गाव निवडा या पर्यायाच्या खाली जिल्हा तालुका आणि गाव यांची निवड करायची आहे म्हणजे तुमचा जिल्हा कुठला आहे तुमचा तालुका कोणता आहे आणि तुमचा तुमच्या गावाचं नाव काय आहे याची या सगळ्यांची व्यवस्थित एकदा निवड करून घ्यायची आहे.
- त्या नंतर खाते दर निवडा या पर्यायी वरती यायचा आहे, त्यामध्ये पहिले नाव, मधले नाव ,आडनाव ,खाते क्रमांक, गट क्रमांक ही सर्व माहिती तुम्हाला निवडून खातेदार निवडता येतो खातेदार इथे करता येतील.
- त्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवण्यासाठी पुढे ऑप्शनवर क्लिक करायचे कारण तुम्ही मोबाईल नंबर आधीच टाकलेला आहे त्याच्यामुळे आता तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाणार आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की नोंदणी झालेली असेल म्हणजे आधीच नोंदणी केलेली असेल तर ऑप्शन येतील हो किंवा नाही.
- तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल खातेदाराचं नाव तिथे निवडायचंय तो ओटीपी टाकायचा आहे नंतर आता सुरुवातीला पुढे तुम्ही ज्यावेळेस याल सुरुवातीला तुम्हाला जमिनीची पड माहिती भरा असा एक ऑप्शन दिसेल यामध्ये दुष्काळ पड आहे, प्रतिकूल पाऊस पड, आहे गरिबी पड आहे, तंटा पड आहे असे वेगवेगळे ऑप्शन्स येतील त्यामधून तुमचे जो पर्याय आहे ते तुम्हाला निवडायचा आहे.
- त्याच्याखाली क्षेत्र किती आहे ते टाकायचा आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पीक माहिती वरती तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
- ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर काय होतं तर इथे खाते क्रमांक ,गट क्रमांक, एकूण क्षेत्र, पोट खराब हंगामा मध्ये एक पीक आहे की बहु पिक आहे, पॉलिहाऊस, शेडनेट आहे, हे सगळे पर्याय निवडायचे म्हणजे ही सगळी माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे .
- त्यासोबतच झाडांची संख्या ,क्षेत्र किती आहे, की धरणे की कोरडवाहू आहे त्याची निवड करायची आहे .
- आता तुम्हाला किती तारखेला पिकाची लागवड केलेली आहे ते इथं तुम्हाला नोंद करायची आहे.
- आता पुढे जा वरती क्लिक करायचं आता छायाचित्र असा एक ऑप्शन तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला दिसेल त्यामध्ये छायाचित्र वरती क्लिक करायचं तुम्हाला , त्यामध्ये छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन आणि तुमच्या स्क्रीनवर आलेले असतील तर एक वर क्लिक केलं की मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल.
- त्यानंतर सूचना येईल की तुम्ही गट क्रमांक चा कुठे उभा हात म्हणजे गट क्रमांकचा जवळपास तुम्हाला शेतात जाऊन ही पाहणी करावी लागते .
- त्यामुळे तुम्ही नेमके कुठे उभे आहात याची सूचना तुम्हाला येईल तर गट क्रमांक च्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्या दुरून फोटो घेतला तर पुढे चालून समस्या येतात .
- त्यानंतर छायाचित्र दोन वरती क्लिक करायचं आता त्यामध्ये काय असतं तर त्यामध्ये पिकाचा दुसरा एक फोटो घ्यायचा दुसरे फोटो असे दोन फोटो आणि नोंदणीसाठी आवश्यक असतात आता दोन्ही फोटो आल्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं पिकाचा फोटो दूरवरून उभा राहून काढू नका लक्ष द्या नाही तर पुढे जाऊन तुम्हाला त्रुटी येतात.E-Peek Pahani Last Date
✅माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु;CLCIK HERE
ई-पीक पाहणी ऑनलाइन फॉर्म दुरुस्ती
- आता दोन्ही आणि अचूक असल्याचं मी घोषित करतो असं एक ऑप्शन तुम्हाला खाली कोपऱ्यात दिसेल आणि पुढे जा आता सूचना येईल .
- पिकाची माहिती अपलोड झालेली आहे म्हणजेच पाहणी नोंदणी केलेली माहिती पाहिजे असेल त्याची माहिती त्यामध्ये ती माहिती पहा या ऑप्शन वरती क्लिक करा.
- काय काय नोंदणी केलेली आहे तसेच नोंदणी करताना एखादी चूक झाली असेल म्हणजे मागे पुढे काय झालं असेल तर ती दुरुस्त करण्याचा ऑप्शन सुद्धा दिलेला असतो त्यावर क्लिक करून दुरुस्त तुम्ही करू शकता.
- आणि पुढे जा आता सूचना येईल पिकाची माहिती अपलोड झालेली आहे म्हणजेच तुमची ईपिक पाहणी नोंदणी पूर्ण झालेली असेल.
- नोंदणी केलेली माहिती पाहिजे असेल तर होम वर्ती क्लिक करून पिकाची माहिती असा एक ऑप्शन दिसतो कोपऱ्यात त्यामध्ये पिकाची माहिती पहा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि तिथे तुम्ही पाहू शकता की तुम्ही अर्जात काय काय नोंदणी केलेली आहे .
- पुढे काय झालं असेल तर दिलेला असतो त्यावर क्लिक करून करू शकता तसेच माहिती पूर्णपणे डिलीटही करता येऊ शकते आणि नव्याने की पिक पाणी नोंदणी पुन्हा करता येऊ शकते.
- पण एक लक्षात घ्या ॲप मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की तांत्रिक अडचणी येऊ शकतात पीक कर्ज असेल नुकसान भरपाई असेल मदत निधी असेल किंवा हमीभाव खरेदीची प्रक्रिया असेल या प्रक्रिया अडचणी येणार नाही आणि शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येईल .
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃ई-पीक पाहणी प्रकल्प PDF | येथे क्लिक करा |
📱ई-पीक पाहणी नोंदणी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit maharojgaryatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!